तिन्ही लोहमार्गांवर मुंबईत उद्या ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मुंबई - लोहमार्ग, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी रविवारी (ता. 28) मुंबईच्या तिन्ही उपनगरी लोहमार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मेनलाइनवर मुलुंडपासून माटुंगा स्थानकापर्यंतच्या धीम्या मार्गावर, हार्बरवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवर आणि पश्‍चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान दोन्ही दिशांच्या मार्गांवर ब्लॉक असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.