‘जलपरी’मुळे बोटिंगला सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - नेरूळ सेक्‍टर २६ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे जलपरी (भू-जलचर बस) येणार असल्याने महापालिकेने तेथील बोटिंगचा प्रस्ताव जवळजवळ गुंडाळला आहे.

ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे बोटिंग सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. त्यासाठी सात वेळा निविदाप्रक्रिया राबवली होती; मात्र कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेला बोटिंगचे बेत रद्द करावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पाम बीच रोडच्या शेजारी नेरूळजवळच्या धारण जलाशयाचा पालिकेने काही वर्षांपूर्वीच कायापालट केला आहे. या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने महापालिकेने सुमारे १८ कोटी रुपये खर्च करून तलावाच्या किनारी जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम, शौचालये, आसन व्यवस्था, ॲम्फीथिएटर आणि अन्य सोई-सुविधा दिल्या आहेत. तेथे सायकल ट्रॅक बांधण्याचा प्रस्तावही महापालिकेच्या विचाराधीन आहे. 

धारण तलावात बारमाही पाणी असल्याने बोटिंग सुरू करून पर्यटनाला चालना देण्याचा विचार महापालिकेने केला होता. त्यासाठी ६ कोटींचा खर्च करण्याची तयारीही केली होती. सात वेळा निविदा प्रक्रियाही राबवल्या; परंतु एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. जेएनपीटी प्रशासनाने आपल्याकडे धूळ खात पडून असलेली ॲम्फीबीएस बस महापालिकेला देऊ केल्याने बोटिंगचा प्रस्ताव गुंडाळल्यात जमा आहे. नेरूळसोबत कोपरखैरणे येथील तलावातही महापालिकेने बोटिंगसाठी चाचपणी केली होती; परंतु तो तलाव शहराच्या अगदी एकाबाजूला असल्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या पाहता बोटिंगला चांगला प्रतिसाद मिळणार नाही, हे लक्षात आल्यामुळे कोपरखैरणेत बोटिंग सुरू करण्याची चाचपणी थांबवावी लागली.  मात्र आता नवी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना बोटिंगऐवजी जमिनीवरून पाण्यात आणि पाण्यातून जमिनीवर चालणाऱ्या भू-जलचर बसमधील प्रवासाचा थरार अनुभवता येईल.