बोईंग विमानामुळे भारताचा खूप फायदा होईल- डॉ. दिनेश केसकर

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

बोईंगमुळे भारतीय प्रवाषयांचा वेळ तर वाचेलच शिवाय अन्यही बाबतीत खूप खूप फायदा होईल.

मुंबादेवी : भारतात मध्यम वर्गीय लोकांचा आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांना भारतातील तसेच जगातील विविध पयर्टन स्थळांना भेटी देण्यास सहज शक्य आहे आणि त्यांना बोईंग विमानातून प्रवास करताना एक अविस्मरणीय आनंद प्राप्त होईल, असे एशिया पेसिफिक एण्ड इंडिया सेल्स बोईंग कमर्शियल एअरप्लेनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. दिनेश केसकर यांनी सांगितले.

बोईंग विमानाच्या भारतातील प्रवेशाच्या बाबतीत गेटवे ऑफ इंडिया येथील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. प्रवासी वाहतूक उच्च दर्जाची असून प्रवासी आसन क्षमता जास्त उत्तम असल्याचे पुढे म्हणाले, बोईंगमुळे भारतीय प्रवाषयांचा वेळ तर वाचेलच शिवाय अन्यही बाबतीत खुप खुप फायदा होईल.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :