वाशीतून अपहरण झालेला 3 वर्षीय रघु सापडला

मिलिंद तांबे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सहा सप्टेंबरला संध्याकाळी आरोपीने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले होते. एका महिलेला तो मिळाला होता. त्याचा फोटो काल माध्यमांमध्ये आल्यानंतर महिलेने रात्री वाशी पोलिसांकडे मुलाला सुपुर्त केले आहे. आरोपीचा तपास अजून लागलेला नाही.

मुंबई : वाशी रेल्वे स्थानकासमोरून पळवून नेण्यात आलेला रघु शिंदे (वय 3) हा मुलगा कळवा येथे सापडला आहे.

सहा सप्टेंबरला संध्याकाळी आरोपीने मुलाला रेल्वे स्थानकावर सोडून दिले होते. एका महिलेला तो मिळाला होता. त्याचा फोटो काल माध्यमांमध्ये आल्यानंतर महिलेने रात्री वाशी पोलिसांकडे मुलाला सुपुर्त केले आहे. आरोपीचा तपास अजून लागलेला नाही.

वाशी पोलिसांनी रघुला पालकांकडे दिले आहे. मात्र रघु तीन दिवस कुठे होता, त्याच अपहरण का करण्यात आले होते हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तीर्णच आहेत. वाशी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र अपहरण झालेला आपला 3 वर्षाचा लाडका सुखरूप मिळाल्याने रघुच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर मात्र हसू उमटलय.