मध्य रेल्वे उभारणार स्तनपान कक्ष

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

मुंबई - तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पश्‍चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांत स्वतंत्र स्तनपान कक्ष सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे. मध्य रेल्वेवरील दादर आणि कल्याण स्थानकांत स्तनपान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी पश्‍चिम रेल्वेमार्गावर वांद्रे स्थानकात स्तनपान केंद्र सुरू करण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात देशात स्थानकांमध्ये स्तनपान कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत मुंबईतील लोकल मार्गावरील वांद्रे स्थानकात स्तनपान कक्ष सुरू करण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांतून नवजात शिशूसह तान्ह्या बाळासह प्रवास करणाऱ्या महिलांकरिता स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित आहे. त्यानंतर मध्य रेल्वेने दादर, कल्याण या स्थानकांत स्वतंत्र स्तनपान कक्ष सुरू करण्याचे ठरवले आहे. पश्‍चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकातही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ठिकाणी स्तनपान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. 

दादर, कल्याण स्थानकात नवजात शिशू, तान्ह्या बाळासह प्रवास करण्याऱ्या महिलांसाठी प्रतीक्षा कक्षात स्वतंत्र स्तनपान खोली येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.