मुंबई: भायखळात इमारतीचा काही भाग खचल्याने रहिवाशांत दहशत

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

एक ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता इमारतीला दर्शनी कॉर्नर भागाला तडे जाऊन पहिल्या मजल्यावरील खोलीतील तळ भाग खचला आणि लोकांत घबराट पसरली.ही इमारत 2 मजली असून तळ मजला धरून 3 मजले आहेत. कोपऱ्याचा भाग खचल्याने स्थानिकांत घबराट पसरली आहे.

मुंबई : भायखळा येथील बी.जे. मार्गावरील हबीब मेंशन या इमारतीचा दर्शनी भाग खचल्याने रहिवाशी आणि स्थानिकांत दहशतीचे वातावरण आहे.

एक ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता इमारतीला दर्शनी कॉर्नर भागाला तडे जाऊन पहिल्या मजल्यावरील खोलीतील तळ भाग खचला आणि लोकांत घबराट पसरली.ही इमारत 2 मजली असून तळ मजला धरून 3 मजले आहेत. कोपऱ्याचा भाग खचल्याने स्थानिकांत घबराट पसरली आहे.

या घाबराटीच्या पार्श्वभूमी घाटकोपर इमारत दुर्घटनेची असल्याने लोकांत दहशत आहेच.मुंबई अग्निशमन दलाच्या 3 गाड्या सकाळी 8 वाजता घटनास्थळी आल्याने तात्काळ इमारतीच्या धोकादायक भागाच्या वरील पहिला व दुसरा मजल्यावरील कुटुंबासह 6 घरे खाली करण्यात आली. मदत कार्यात स्थानिक माजी आमदार आणि माजी म्हाडा अध्यक्ष मधु चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. मुंबई इमारत विकास व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचे कार्यकारी अभियंता (ई वार्ड म्हाडा) यांनी सांगितले, की ही इमारत सुपारीवाला नामक व्यक्तीच्या मालकीची असून धोकादायक भाग दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर काम करीत आहोत. येथील रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबिरात हलविण्यात येईल.

रहिवाशी अमिन भाई आणि मोहम्मद गडिया यांनी सांगितले की रात्री इमारतीला तड़े गेल्याचे आणि कोपऱ्याचा भाग खचल्याचे पाहिले आणि काळजात धस्स झाले.मग मधु चव्हाण यांना फोन करुन सांगितले आणि मग सरकारी यंत्रणा हलली.
सदय स्थितित येथे आग्रीपाडा पोलिस वरिष्ठ निरीक्षक अशोक सरंबळकर यांच्या सह पोलिस अधिकारी व 80 कर्मचारी आणि एक राज्य राखीव पोलिस दलाची तुकड़ी बन्दोबस्तावर आहे.पोलिस उपायुक्त अखिलेश सिंह ,सहाय्यक आयुक्त पाटणकर हे प्रत्यक्ष घटना स्थळी हजर राहून पोलिसांना सुचना करीत होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM