अवतरणार ‘जलपरी’

अवतरणार ‘जलपरी’

नवी मुंबई - रस्त्यावर धावता धावता अचानक पाण्यात घुसून चक्क पाण्यावर धावणारी बस सर्वांनी पाहिली असेल. या बसमधून प्रवास करण्याचा आनंद लवकरच नवी मुंबईकरांना लुटता येईल.

नवी मुंबई महापालिका जेएनपीटीच्या मदतीने पाण्यातून धावणारी बस पर्यटनवाढीसाठी आणणार आहे. हा प्रकल्प सुमारे ११ कोटींचा आहे. प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर ही बस काही दिवसांत किंवा महिन्यांत पाण्यावर धावू लागेल.

सॅटेलाईट सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबई शहराला त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे देशभरासह जगभरातील पाहुणे भेट देतात. हे लक्षात घेऊन आणि अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महापालिका जलबसचा प्रयोग करणार आहे. पालिकेने जवाहरलाल नेहरू पत्तन न्यास यांच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जेएनपीटीने खरेदी केलेली ही उभयचर बस लवकरच महापालिकेच्या ताब्यात येईल. 

जमीन आणि पाण्यावरूनही ही बस धावत असल्याने तिला ॲम्फीबीअस (भू-जलचर बस) असे म्हणतात. बसपुरवठा आणि ती चालवण्यापर्यंतची यंत्रणा जेएनपीटी पुरवणार आहे. त्यासाठी महापालिकेशी ५ वर्षांचा करारही जेएनपीटी करणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यापैकी २५ टक्के महापालिकेला आणि ७५ टक्के नफा जेएनपीटीला मिळणार आहे. अशा प्रकारची भू-जलचर बस चंडिगडमध्ये आहे. 

जलपरीचा मार्ग
महापालिका मुख्यालय ते नेरूळ सेक्‍टर २६ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या मार्गावर भू-जलचर बसने सैर करता येईल. मुख्यालयापासून निघालेली बस पाम बीच रस्त्यावरून ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या तलावात उतरून फेरफटका मारेल. यानंतर पुन्हा बस त्याच मार्गाने मूळ ठिकाणी येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com