सट्टेबाजीप्रकरणी व्यावसायिकाला अटक 

सट्टेबाजीप्रकरणी व्यावसायिकाला अटक 

मुंबई - आयपीएल स्पर्धेतील सट्टेबाजी प्रकरणातील मनी लॉंडरिंगप्रकरणी तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) याप्रकरणी मुंबईतील व्यावसायिक बिमल राम गोपाल अग्रवाल याला अटक केली. पोलिस दलाला कमी दर्जाचे बुलेटप्रूफ जॅकेट पुरविल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अग्रवालला यापूर्वी 2012 मध्ये अटक केली होती. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातील आरोपींना मदत करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ईडीचे गुजरातमधील तत्कालीन सहसंचालक जे. पी. सिंग व इतर दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्याप्रकरणी अग्रवाल गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या रडारवर आला होता. त्यानंतर सीबीआयने अग्रवाल तसेच अन्य एक सट्टेबाज सोनू जालान यांच्या अटकेसाठी मोहीम राबविली होती. त्यानंतर सीबीआयने अग्रवालला 21 फेब्रुवारीला अटक केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com