दहीहंडी उत्सव शांततेने साजरा करा - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - यंदाचा दहीहंडी उत्सव डीजे, ढोलताशे न वाजवता पारंपरिक पद्धतीने साजरा करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दहीहंडी समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दादरमधील "कृष्णकुंज' या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होते. रस्त्यांवर मंच बांधू नका, असे सांगत राज यांनी, दहीहंडीच्या उत्सवाला राजकारण, बाजारीकरण येऊ नये, यासाठी कुणालाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलावू नका, असेही सुचवले.