मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील बिघाड आदी कामांसाठी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील बिघाड आदी कामांसाठी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

ब्लॉक दरम्यान रविवारी सकाळी 10.47 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि ठाणे स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. या गाड्या ठाणे, दिवा व डोंबिवली स्थानकात थांबे घेतील आणि आपल्या नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहचतील.

ब्लॉक दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या कळवा, मुंब्रा, कोपरखैरणे आणि ठाकुर्ली स्थानकात थांबणार नाही. या मार्गावरील प्रवाशांना अप दिशेने ठाणे, डोंबिवली व कल्याणमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

रविवारी सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या आपल्या नियोजित थांब्या व्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकांत थांबे घेतील. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहचतील.

रविवारी सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या आपल्या नियोजित थांब्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने पोहोचतील. सीएसएमटी येथून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व गाड्या रविवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहचतील.

हार्बर
हार्बर मार्गावर पनवेल-नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.30 ते 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 4.26 वाजेपर्यंत सीएसटीएम ते पनवेल आणि पनवेल ते सीएसटीएम, बेलापूर ते सीएसएमटी येथे रवाना होणाऱ्या आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरला सुटणाऱ्या गाड्या सकाळी 10.03 ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत रद्द राहतील.

रविवारी सकाळी 11.02 ते दुपारी 4.26 वाजेपर्यंत पनवेल येथून ठाण्याला रवाना होणाऱ्या सर्व गाड्या आणि ठाणे येथून पनवेलला रवाना होणाऱ्या सर्व गाड्या रविवारी सकाळी 11.14 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुटणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व सेवा बंद राहतील. ब्लॉक दरम्यान पनवेल-अंधेरी दरम्यान सर्व गाड्या रद्द राहतील. ब्लॉक दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील.

Web Title: mumbai news central harbour mega block