मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसतर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सुकाणू समितीला "जिवाणू समिती' आणि आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने जाहीर निषेध केला आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शेतकऱ्यांना "साले 'म्हटले. भाजपच्या इतर नेत्यांनीही अनेकदा शेतकऱ्यांची मानहानी केली. भाजप नेत्यांची ही वक्तव्ये त्यांच्या पक्षाची संस्कृती दर्शवितात; परंतु मुख्यमंत्र्यांच्या पदाला अशा तऱ्हेची भाषा अशोभनीय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज म्हटले होते, असेही सावंत यांनी सांगितले.

Web Title: mumbai news congress protest to chief minister