नगरसेविकेच्या पतीची मुख्य लेखापालाला मारहाण 

 नगरसेविकेच्या पतीची मुख्य लेखापालाला मारहाण 

कल्याण - महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका मनीषा तारे यांचे पती साईनाथ यांनी पालिकेचे मुख्य लेखापाल दिग्विजय चव्हाण यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. खडकपाडा परिसरातील एका एटीएम केंद्राबाहेर घडलेल्या या प्रकाराची पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली आहे.

खडकपाडा परिसरातील एका एटीएममधून पैसे काढण्यासाठी चव्हाण पत्नीसमवेत शनिवारी सकाळी गेले होते. पैसे काढत असतानाच साईनाथ तारे यांनी काचेवर टकटक केले. एटीएममधून बाहेर आल्यावर चव्हाण यांनी जाब विचारला असता, तारे यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. साईनाथ तारे हे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत; तर त्यांच्या पत्नी मनीषा प्रभाग क्रमांक 19 मधून नगरसेविका आहेत. दरम्यान, तारे यांनी चव्हाण यांनीच आपल्या सुरक्षारक्षक आणि गाडीचालकाला दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com