उच्च न्यायालयात लवकरच पाळणाघर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

मुंबई - कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांची देखभाल करता येईल, या उद्देशाने आता मुंबई उच्च न्यायालयानेही पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. 4) सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन होणार आहे.

ऍडव्होकेट्‌स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (आवी) या वकिलांच्या संघटनेने महिला वकिलांच्या मुलांसाठी पाळणाघर असावे, यासाठी मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांना निवेदन दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही अशा प्रकारच्या बाल संगोपन केंद्राची गरज निर्धारित केली आहे. दरम्यान, खटल्यांची सुनावणी शीघ्रतेने निकाली निघावी यासाठी पर्यायी तक्रार निवारण केंद्राचा पायाभरणी समारंभही सरन्यायाधीशांच्या हस्ते होणार आहे.