जर्मन वकिलातीच्या फसवणुकीचा प्रयत्न

जर्मन वकिलातीच्या फसवणुकीचा प्रयत्न

मुंबई - जर्मन वकिलातीच्या फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या गुतरातमधील दोन रहिवाशांना मरिन ड्राइव्ह पोलिसांनी नुकतीच अटक केली. दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर करून व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी परदेशी एजंटसह त्याचा साथीदारही पोलिसांच्या रडावर आला आहे.

कृणाल देसाई व केतुल पांड्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. देसाई हा अहमदाबाद आणि पांड्या हा मेहसानाचा रहिवासी आहे. जर्मन वकिलातीत काउंसलर व व्हिजा विभागाचे प्रमुख ऍन्जो कॅलॉस यांच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देसाई आणि पांड्या हे व्हिसा मिळवण्यासाठी जर्मन वकिलातीमध्ये आले होते. त्या वेळी नोंदणी प्रमाणपत्र, आरोग्य प्रमाणपत्र, बॅंकेची कागदपत्रे, पारपत्रांची दुय्यम प्रत, गुजरात सरकारचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर केली होती; मात्र पडताळणीत ती बनवट असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com