नोकरीच्या प्रलोभनातून लाखांेची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मुंबई - आखाती देशांत नोकरी मिळवून देतो असे प्रलोभन दाखवत ९१ जणांची फसवणूक झाल्याची घटना गोरेगावमध्ये उघडकीस आली. ३२ लाखांची फसवणूक करून तीन आरोपी पळून गेले आहेत. जानेवारीत तिघांनी गोरेगाव पश्‍मिमेकडील मोतीलाल नगर येथे सनराईज रिक्रूटमेंट नावाने कंपनी सुरू केली. दुबई, शारजाह, सौदी येथे मोठ्या वेतनाची नोकरी देतो असे प्रलोभन ही कंपनी दाखवत असे. या कंपनीने ९१ जणांकडून नोकरीसाठी पासपोर्ट व ५० हजार दिले. त्यांना बनावट व्हिसा, नोकरीचे करारपत्र दिले. फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात येताच कंपनीच्या या भामट्यांनी पळ काढला.