सीबीडी-बेलापूरमध्ये भरदिवसा सव्वा लाखाची लूट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 डिसेंबर 2017

नवी मुंबई - नवी मुंबई शहरात दुचाकीवरील चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सीबीडी-बेलापूर येथील सेक्‍टर-11 मध्ये दिवसाढवळ्या "सकाळ'च्या कर्मचाऱ्याकडील सुमारे एक लाख 24 हजारांची रक्कम चोरट्यांनी लांबविली. या वेळी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. "आयडीबीआय' बॅंकेसमोरील वर्दळीच्या चौकात ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

सीबीडी-बेलापूर येथील "सकाळ' कार्यालयातील कर्मचारी नरेंद्र भोजगतर दुपारी साडेबाराच्या सुमारास सेंट्रल बॅंकेतून कर्जाची रक्कम घेण्याकरिता गेले होते. त्यांनी बॅंकेतून एक लाख 24 हजार रुपये काढले. ते हातातील पिशवीत पैसे घेऊन "सकाळ' कार्यालयात पायी येत होते. सेंट्रल बॅंकेच्या शेजारच्या फूटपाथवरून "आयडीबीआय' बॅंकेसमोरील चौकात आले. ते रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी उभे होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने भोजगतर यांच्या हाताला हिसका मारला. त्यानंतर भोजगतर यांच्या हातातील एक लाख 24 हजारांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास करून पळ काढला. भोजगतर यांनी आरडाओरड करत तत्काळ चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही. भरधाव वेगाने दुचाकीवरून दोघे चोरटे पळून गेले. या प्रकरणी भोजगतर यांनी बेलापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

दरम्यान, सीबीडी-बेलापूर सेक्‍टर 11 परिसरात आयडीबीआय, ऍक्‍सिस, आयसीआयसीआय, सेंट्रल बॅंक अशा अनेक बॅंका आहेत. या बॅंकांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक पैशांचे व्यवहार करतात. 

Web Title: mumbai news crime loot belapur