मोर्चा काढल्याबद्दल मनसेवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - एल्फिन्स्टन-परळला जोडणाऱ्या पुलावरील चेंगराचेंगरीनंतर गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्चाबाबत आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी न घेता हा मोर्चा काढल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा आयोजकांवरदाखल करण्यात आला आहे. या मोर्चामुळे सार्वजनिक रहदारीला अडथळा निर्माण झाला, असे पोलिसांनी नोंदवले आहे.
Web Title: mumbai news crime on MNS by rally