रेल्वेस्थानकात तरुणीचा विनयभंग करणारा अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - लोकलची वाट पाहत असलेल्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. उदित नारायण रामपाल पाठक असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. 

मुंबई - लोकलची वाट पाहत असलेल्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. उदित नारायण रामपाल पाठक असे त्याचे नाव असून, न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. 

रेल्वेस्थानकात महिलांचे व्हिडीओ छायाचित्रण करणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. तक्रारदार महिला मंगळवारी (ता. 27) अंधेरी स्थानकात मित्रासोबत उभी होती. सायंकाळची वेळ असल्याने स्थानकात प्रचंड गर्दी होती. त्या वेळी उदित तेथे आला, गर्दीचा फायदा घेत त्याने महिलेशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर उदितने पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करताच तिच्या मित्राने पाठलाग करून उदितला पकडले. त्याला पकडून अंधेरी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उदित विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून बुधवारी (ता. 28) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. उदित हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, तो काही दिवसांपूर्वीच नातेवाइकांकडे राहण्यास आला होता.