एमडी विक्रीप्रकरणी तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - एमडी या अमली पदार्थाच्या विक्रीकरिता आलेल्या तिघांना नुकतीच पवई पोलिसांनी अटक केली. मोहंमद अकीब शमीम शेख, मेहंदी हसन जहीर इसत मिर्झा, नरेश सुरेश माला अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 43 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. न्यायालयाने तिघांनाही गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पवई परिसरात एमडीची विक्री करण्याकरिता तीन जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार कारवाईकरिता पवई पोलिसांनी दोन पथके तयार केली. एका पथकाने मोहंमद अकीबला; तर दुसऱ्या पथकाने मेहंदी आणि नरेशला ताब्यात घेतले. तिघांकडून 43 ग्रॅम एमडी जप्त केले. एमडी तस्करीप्रकरणी तिघांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: mumbai news crime three arrested