आरोपी कुरुंदकरच्या चालकाला अटक 

आरोपी कुरुंदकरच्या चालकाला अटक 

नवी मुंबई - महिला पोलिस अधिकारी आश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ताप्रकरणी आरोपी अभय कुरुंदकर याचा चालक कुंदन नामदेव भंडारी याला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. कांदिवलीतील बांद्रापाडा येथून पोलिसांनी भंडारीला अटक केली आहे. 

गोरे बेपत्ता प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी कुरुंदकर याच्यासोबत भाजपचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजेश पाटील याला आधीच अटक केली आहे. दोन महिन्यांपासून या दोघांकडून गुन्ह्याची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा आटोकाट प्रयत्न सुरू होता; मात्र कुरुंदकरने पोलिस दलात जास्तीत जास्त वर्षे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात काम केले असल्याने पोलिसांना त्याच्याकडून माहिती मिळविण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांच्या हाताला कुरुंदकरचा चालक कुंदन भंडारी लागल्याने या प्रकरणाला महत्त्वाचे वळण लागले आहे. गोरे-बिंद्रेची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी भंडारीने कुरुंदकरला मदत केली असल्याचा संशय नवी मुंबई पोलिसांना भंडारीवर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com