वांद्रे स्थानकात महिलांचा व्हिडीओ काढणाऱ्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

मुंबई - वांद्रे स्थानकात महिलांचा व्हिडीओ काढणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली. आसिफ अब्दुलगनी खान असे त्याचे नाव आहे. त्याची न्यायालयाने रविवारी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. 

मुंबई - वांद्रे स्थानकात महिलांचा व्हिडीओ काढणाऱ्याला लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी अटक केली. आसिफ अब्दुलगनी खान असे त्याचे नाव आहे. त्याची न्यायालयाने रविवारी 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली. 

कांदिवलीत राहणारा आसिफ सेल्समन आहे. शनिवारी तो वांद्रे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक 1 वर मैत्रिणींशी बोलणाऱ्या महिलेचा व्हिडीओ काढत होता. ते निदर्शनास आल्यावर त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आसिफने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाठलाग करत आसिफला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही अश्‍लील क्‍लिप पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे.