चोरीचा पैसा डान्स बारमध्ये उडवणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

मुंबई - उच्चभ्रू वस्तीतील दुकानांवर दरोडा टाकून चोरीचा पैसा डान्स बारमध्ये उडवणाऱ्या अकील मजलूम खान याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

अकीलला अटक करण्यासाठी पोलिस नागपाड्यातील एका डान्स बारबाहेर तीन दिवसांपासून रात्री पाळत ठेवत होते. अकीलचे दोन साथीदार फरारी आहेत. त्यांचा माग काढण्यासाठी पोलिस लवकरच उत्तर प्रदेशला जाणार आहेत.

वांद्य्रातील उच्चभ्रू वस्तीतील एका दुकानावर जानेवारीत दरोडा पडला होता. चोरट्यांनी रोकड आणि मोबाईल लांबवला होता. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली. दरोडा टाकल्यानंतर अकील मोबाईल फोन बंद करीत असे. तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून प्रथम त्याचा पत्ता शोधला. मात्र, तेथे तो राहत नसल्याचे आढळले. दरम्यानच्या काळात तो नागपाड्याच्या डान्स बारमध्ये पैसे उडवत असतो, अशी टीप पोलिसांना मिळाली. गुरुवारी रात्री (ता.25) तो या डान्स बारमध्ये आला. तो तेथे एका महिलेसह बसला होता. पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याने गुन्हा कबूल केला. अकीलवर 20 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.