नवजात बालक मृत्यूबाबत दोषींवर गुन्हे दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

मुंबई - अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत दोषींबर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली.

महाविद्यालयाच्या रुग्णालयात चार नवजात बालकांच्या मृत्यूबाबत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना गिरीश महाजन बोलत होते. ""ही घटना गंभीर असून, यासंदर्भात चार जणांची तज्ज्ञ समिती नेमली होती. या प्रकरणात दोन परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटकही करण्यात आली होती.