ग्राहक पंचायतीचे जीनिव्हात सादरीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

मुंबई - जीनिव्हा येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) विकास आणि व्यापार परिषदेत सहा जुलै रोजी मुंबई ग्राहक पंचायत ऍपवर आधारित ओला, उबेर टॅक्‍सी सेवांवर सादरीकरण करणार आहे.

सादरीकरणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. "ओला, उबेर स्पर्धेचे तारक की मारक' असा या सादरीकरणाचा विषय आहे.

गेल्या वर्षी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओला, उबेर तसेच टॅक्‍सी आणि रिक्षा सेवेबाबत एक ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात 76 हजारांहून अधिक ग्राहकांची मते आजमावण्यात आली होती. या सर्वेक्षणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली होती.