"गोविंदां'च्या याचिकेवर आज सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

गोविंदांचे वय 18 हून अधिक असण्याची सक्ती केली होती.

मुंबई : दहीहंडीची उंची वाढवण्यासंदर्भात गोविंदा पथकांच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठविले आहे. उद्या (ता. 7) या संदर्भातील सुनावणी होणार असून गोविंदांसह सर्वसामान्यांचेही लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.

दहीहंडी फोडताना होणारे अपघात लक्षात घेता 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा कमी; तर गोविंदांचे वय 18 हून अधिक असण्याची सक्ती केली होती. या निर्णयाला 18 गोविंदा पथकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.