मुंबईत दहीहंडी उत्सवात तीन गोविंदांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मुंबई - दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांमध्ये मंगळवारी जणू स्पर्धाच लागली होती. मात्र पालघर, नवी मुंबई व उरण येथे तीन गोविंदांचा मृत्यू झाल्याने या उत्सवाला गालबोट लागले. धनसार काशीपाडा (ता. पालघर) येथे दहीहंडी फोडल्यानंतर खाली उतरल्यावर रोहन गोपीनाथ किणी (वय २१) हा तरुण जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. पालघर पोलिसांनी अपमृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. 

विजेच्या झटक्‍याने मृत्यू
नवी मुंबई ः ऐरोलीतील सेक्‍टर ५ येथे दहीहंडी उत्सवात जयेश तारले (वय ३०) या गोविंदाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या सुनील चौगुले मित्र मंडळातर्फे काल दहीहंडीचे आयोजन केले होते. चुनाभट्टीहून प्रेमनगर गोविंदा पथक आले होते. ते मनोरा रचण्यासाठी तयार होत होते. त्या वेळी जयेश तारले याचा शेजारच्या सोसायटीच्या संरक्षण भिंतीच्या फाटकाला स्पर्श झाला. त्या वेळी विजेच्या जोरदार धक्‍क्‍याने तो जमिनीवर कोसळला. त्याला महापालिकेच्या वाशीतील रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. 

तळ्यात बुडून मृत्यू
उरण  ः दहीहंडीनंतर पोहायला गेलेल्या महेश गंगाधर फड (वय १७) या तरुणाचा काल बुडून मृत्यू झाला. उरण तालुक्‍यातील सोनारी गावात ही घटना घडली. महेश हा मित्रांसोबत गावातील तळ्यात अंघोळ करण्यासाठी गेला होता; मात्र त्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला.