घाटकोपर आणि भेंडी बाजार इमारत दुर्घटनेपासून पालिका धडा केंव्हा घेणार?

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जीव मुठीत घेऊन खातेदारांची टपाल आणि खाते सेवा

मुंबईः घाटकोपर आणि नुकत्याच गणेशोत्सवा दरम्यांन भेंडी बाजार येथील धोकादायक इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक बळी जाऊनही मुंबई महानगर पालिका आणि पोस्ट प्रशासनाच्या डोळ्यांवरील झापड़े उघडली गेलेली नाहीत. त्यातच मनपा ई विभागाच्या  हलगर्जीपणाचा जिवंत नमूना ठरतेय ती डॉकयार्ड रेल्वे स्थानका जवळील खादी ग्रामोद्योगवाडीची अत्यंत धोकादायक स्थितीतील इमारत आणि त्या इमारतीच्या तळाला असलेले भारतीय पोस्ट खात्याचे पोस्ट ऑफिस आणि त्यातील आपला जीव धोक्यात घालून खातेदारांना सेवा देणारे निष्पाप कर्मचारी.

15 नोव्हेंबर 2016 ला याच इमारतीचा स्लॅब कोसळला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी  इमारतीतील नागरिक आणि टपाल कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले होते. तसेच तळाची कॅनेरा बैंक रिकामी करण्यात आली होती. मनपा ई विभागा तर्फे या इमारतीला धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्याने आजही पोस्ट खात्याचे कार्यालय सुरूच असून, नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून पोस्ट कर्मचारी आणि खातेदार आजही आपले दैनंदिन व्यवहार करीत आहेत. ही इमारत जर अचानक कोसळली तर पोष्टातील कर्मचारी खातेदार आणि रस्त्यावरील ये-जा करणारी वाहणे आणि निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ शकतो हे लक्षात घेऊन ही धोकादायक इमारत पालिकेने लवकरात लवकर जमीनदोस्त करावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

धोकादायक इमारतीत कामकाज सुरूच असून, मनपाने इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केलेले असले तरी जो पर्यंत पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी पर्यायी व्यवस्था करीत नाहीत तो पर्यंत हे पोस्ट ऑफिस येथेच धोकादायक परिस्थितीत सुरूच राहील आणि आम्ही सामान्य नागरिक नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून आमची पोस्ट संदर्भातील कामे करण्यास येथे येतच राहणार, असे हेमंत चंद्रकांत विलणकर या तरुणाने सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :