मुंबई : वर्सोवा चौपाटीवर आढळला पुरुषाचा मृतदेह

मंगेश सौंदाळकर
शनिवार, 29 जुलै 2017

मृतदेहाची माहिती मिळताच वर्सोवा पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. पावसाळा असल्याने वर्सोवा चौपाटीवर अनेक जण पोहण्याकरिता येत असतात.

मुंबई : वर्सोवा चौपाटीवर आज (शनिवार) सकाळी गस्तीवर असलेल्या जीवरक्षकांना पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहाची माहिती मिळताच वर्सोवा पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. पावसाळा असल्याने वर्सोवा चौपाटीवर अनेक जण पोहण्याकरिता येत असतात. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जण बुड़तात.

आज सकाळी किरण गाजवे आणि विनोद खाडे हे जीवरक्षक गस्तीवर होते. तेव्हा त्यांना मृतदेह दिसून आला. त्यांनी वर्सोवा पोलिसांना माहिती सांगितली. त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम वर्सोवा पोलिस करत आहे. पोलिसांनी मॄत्युची नोंद केली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: