एक्सप्रेसच्या धडकेत तीन महिला ठार

मंगेश सौंदाळकर
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

काम आटपुन महिला जात मालाड स्थानकात जात असताना हां अपघात झाला असावा, असा अंदाज आहे, दरम्यान शुक्रवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर झालेल्या अपघातात 8 ठार तर 13 जखमी झाल्याची नोंद आहे

मुंबई - वांद्रे - इंदौर या हॉलीडे एक्सप्रेस ने मालाड आणि गोरेगाव दरम्यान चार महिलांना धड़क दिल्याची घटना आज (शनिवार) दुपारी घडली, एक्सप्रेसच्या धड़केत तीन महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला जखमी झाली आहे, तिला उपचारासाठि सरकारी रुग्णालयात नेल्याचे बोरीवली लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

काम आटपुन महिला जात मालाड स्थानकात जात असताना हां अपघात झाला असावा, असा अंदाज आहे, दरम्यान शुक्रवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर झालेल्या अपघातात 8 ठार तर 13 जखमी झाल्याची नोंद आहे,  काही महिन्यापूर्वी घाटकोपर विद्या विहार दरम्यान चार कंत्राटी कामगाराचा मृत्यु झाला होता

Web Title: mumbai news: death women railway