घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना धनादेशाचे वाटप

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते बुधवारी विधानभवन येथे झाले.

इमारत दुर्घटनेतील कुटुंबाच्या पुनर्वसनसाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, असे फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांना या वेळी सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार राम कदम, नगरसेवक नील सोमय्या आदी या वेळी उपस्थित होते.