‘मॅफको’चे पुनरुज्जीवन करणार - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

मुंबई - बंद पडलेल्या महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रकिया महामंडळ (मॅफको) पुनरुज्जीवित करून ‘मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि ‘मॅफको’ यांच्यात सामंजस्य करार करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे सांगितले.

‘मी मुंबई अभियान-अभिमान’ आणि श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीच्या ‘नमो युवा रोजगार केंद्रा’च्या शेतकरी फिरत्या बाजाराचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मॅफको’त सर्व पायाभूत सुविधा आहेत. हे महामंडळ सुरू झाल्याने बेरोजगारांना नोकऱ्याही मिळतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 