धारावीत गारमेंट कंपनीस आग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

धारावी -  धारावीतील ट्रांझिस्ट कॅम्पमधील ब्लॉक क्रमांक तीन येथील घर क्रमांक १०-११ मध्ये असलेल्या गारमेंट कंपनीला शुक्रवारी (ता. १५) सकाळी ७.३०च्या दरम्यान आग लागली. आगीत जीवितहानी झाली नसली तरी जवळपास ७५ लाख किमतीचे कपडे व मशीन खाक झाल्या.

शुक्रवारी अचानक सकाळी कारखान्यातून धुराचे लोट येऊ लागले. स्थानिकांनी अग्निशमन दलाला कळवताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे घराला तडे गेले आहेत. पालिकेचे जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी घटनास्थळास भेट देऊन कारखान्याचा धोकादायक भाग काढण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. अग्निशमन दलाचे सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आर. डी. भोर यांनी शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

टॅग्स