धारावीत दुमजली घर कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

धारावी - धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील ट्रांझिस्ट कॅम्पमधील ब्लॉक क्रमांक ५ येथील दुमजली घर गुरुवारी (ता. २०) सकाळी ६ वाजता कोसळले. यात ११ जण जखमी झाले असून, दोघे गंभीर आहेत. 

धारावी - धारावीतील ९० फुटी रस्त्यावरील ट्रांझिस्ट कॅम्पमधील ब्लॉक क्रमांक ५ येथील दुमजली घर गुरुवारी (ता. २०) सकाळी ६ वाजता कोसळले. यात ११ जण जखमी झाले असून, दोघे गंभीर आहेत. 

मुंबईत काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावासामुळे जुन्या झालेल्या ट्रांझिस्ट कॅम्पमधील दुमजली घर सकाळी ६ वाजताच्या दरम्यान कोसळले. या घरात भाड्याने राहत असलेले ११ जण मातीच्या ढिगाऱ्यात सापडले. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या सर्वांची सुटका केली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून घराचा उर्वरित धोकादायक भाग पाडून टाकला व वीजप्रवाह बंद केला. जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी जखमींवर उपचार करून नऊ जणांना घरी सोडले असून, दोघांवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुभाष पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स