प्रख्यात सारंगीवादक ध्रुवज्योती घोष यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - प्रख्यात सारंगीवादक पं. ध्रुवज्योती घोष (वय 59) यांचे सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. ते "संगीत महाभारती'चे संस्थापक पं. निखिल घोष यांचे सुपुत्र आणि तबलावादक पं. नयन घोष यांचे धाकटे बंधू होते.

एकल सारंगीवादक म्हणून ध्रुवज्योती घोष यांनी ख्याती मिळवली. देशात आणि युरोपात त्यांचे सतत कार्यक्रम होत असत. भारतीय विद्या भवनच्या संगीत नृत्य विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मध्य प्रदेश सरकारतर्फे त्यांना सारंगीवादक उस्ताद अब्दुल लतीफ खान पुरस्कार मिळाला होता.

Web Title: mumbai news dhruvjyoti ghosh no more