दिलीपकुमार रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना बुधवारी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. लीलावती रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सांगितले की, काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. सकाळपर्यंत नेमकी समस्या कळेल. यापूर्वी डिसेंबरमध्ये दिलीपकुमार यांना डाव्या पायाला सूज आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.