आग्रीपाडयात भव्य दिंडी आणि रिंगणाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

अखंड आग्रीपाडा वारकरी सांप्रदाय यांनी आषाढी एकादशी-भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते. विभागातील जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.स्थानिकांसह मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी दिंडीत सहभाग दर्शविला.

मुंबादेवी - दक्षिण मुंबईतील संवेदनशील विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रीपाड्यात आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा प्रति पंढरपुर असलेल्या वडाला विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाला.

अखंड आग्रीपाडा वारकरी सांप्रदाय यांनी आषाढी एकादशी-भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले होते. विभागातील जास्तीत जास्त भाविकांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.स्थानिकांसह मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी दिंडीत सहभाग दर्शविला. ज्ञानोबा माउली तुकारामचा जय घोष आणि आणि महिला वारकरी यांचा उत्साह वीणा वादन, टाळ, चिपळया, मृदुंगाचा लयबद्ध निनाद त्यातच लाडक्या विठोबाच्या आसेने डोक्यावरील तुळशी वृंद सावरत नाचत गात दिंडी पुढे जात असताना काही महत्वाच्या चौकांतून दिंडीचे रिंगण घालण्यात येत होते आणि हे रिंगण पाहुन लोक श्रद्धेने हात जोडीत विठ्ठल रखुमाईला आपला स्नेह देत होते.

बंदोबस्तावरील महिला पोलिसांतही उत्साह संचारला आणि त्यातील एका पोलिसाने महिला वारकरीसह फुगडी घालत आपला आनंद साजरा केला.