दिग्दर्शक प्रसाद गोखले यांचे डोंबिवलीत निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - टीव्ही मालिकांचे दिग्दर्शक प्रसाद गोखले (वय 40) यांचे सोमवारी (ता. 3) सायंकाळी निधन झाले. कलर्स मराठी वाहिनीवरील "अस्सं सासर सुरेख बाई' या मालिकेचे दिग्दर्शन गोखले यांनी केले होते. दिग्दर्शक शशांक सोळंकी यांच्याकडे ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम करत होते. काही दिवसांपूर्वीपासून त्यांनी काम थांबवले होते. मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाल्याने गोखले यांच्यावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे.
टॅग्स