सात फलाटांसाठी एकच स्वच्छतागृह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

दिवा - दिवा रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असली तरीही या परिसरात नागरिकांसाठी सोईसुविधा नाहीत. येथील रेल्वेस्थानकात केवळ एकच स्वच्छतागृह आहे. प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत असल्याने त्यांना उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे.

रेल्वे समस्यांमुळे दिवेकरांनी आंदोलन केले होते. त्यानंतर दिवा स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. एकूण ७ फलाटांसाठी कच स्वच्छतागृह आहे. त्यामुळे ते पुरेसे पडत नसल्यामुळे अनेक प्रवासी लघुशंकेसाठी उघड्यावरच जातात. दिवा फलाट क्रमांक १ व २ वर एक नवे स्वच्छतागृह उभारण्यात आलेले आहे. अपंग व्यक्तींसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचा दरवाजा तुटलेला आहे. तर महिलांसाठी फक्त एकच शौचालय आहे. स्थानक परिसरात पूर्वेला जाताना फाटकाच्या भागात दुर्गंधी पसरलेली असते. 

दिव्यातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रवासी संख्या वाढली आहे. एकच स्वच्छतागृह असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे; तसेच रोज वसई व रोह्याला दिव्यातून गाड्या जातात. त्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर यावे लागते. तिथेही मोठी रांग असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचराही टाकण्यात येतो. 

टॅग्स