भारतात 22 आठवड्यांच्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई: 610 ग्रॅम वजनाच्या 22व्या आठवड्यात जन्माला आलेल्या निर्वाण बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तब्बल चार महिन्यांच्या लढ्यानंतर निर्वाणला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

मुंबई: 610 ग्रॅम वजनाच्या 22व्या आठवड्यात जन्माला आलेल्या निर्वाण बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तब्बल चार महिन्यांच्या लढ्यानंतर निर्वाणला रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

सर्वसाधरण प्रसूतीसारख्या कळा रितिका त्रिवेदी (नाव बदललं आहे) हिला सुरू झाल्या. रितिकाची परिस्थिती पाहून तिला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. बाळाच्या प्रकृतीला फायदा होईल यासाठी स्टेरॉइड्स किंवा इतर उपचार करण्यासाठी वेळच नव्हता. अशी 22 आठवड्यांची गरोदर असलेल्या रितिकाची नैसर्गिक प्रसूती झाली. बाळ जन्माला आले त्यावेळी 610 ग्रॅम वजन आणि 32 सेंटीमीटर उंचीच होतं. बाळाची फुप्फुस जन्मजातच कमी विकसित असल्याने त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होते.

उपचारांदरम्यान निर्वाणच्या फुप्फुसांभोवती हवा साचणे, मेंदूत रक्तस्त्राव होणे अशा दोन मोठ्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या. त्यावरही निर्माणने मात केली. निर्माणची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. हरी बालकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांच्या तुलनेत निर्वाणची प्रकृती चमत्कारिकरित्या चांगली आहे. त्याची शारिरीक वाढ, बौद्धिक वाढ चांगली आहे. या बाळांमध्ये दिसणारे चेतासंस्थेशी निगडीत आजार, मेंदूतील कमतरता, फुप्फुसाचे आजार अशी तक्रारी नाहीत. बाळाचा चांगला विकास झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना डॉ. नंदकिशोर काब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिमॅच्युअर मुलांपेक्षा मुलींच्या जगण्याची शक्यता अधिक असते. गर्भावस्थेच्या केवळ 22 व्या आठवड्यात जन्मलेला आणि परिस्थितीवर मात करुन जीवंत राहिलेला हे भारतातील सर्वात लहान बाळ आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बाळाला ऑक्सिजनची आवश्यकता नसल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी प्रिमॅच्युअर बाळ हे कलंक नाही. या बाळांमध्ये अत्यंत हुशार बाळ असू शकतात, असे आवर्जून सांगितले. निर्वाणवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी निर्वाणचं नाव निर्वाण द फायटर निर्णाण द वॉरिअर असे ठेवले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :