सामाजातील धुरीनांनी सामाजिक दायित्व ओळखून अनाथांचे नाथ व्हावेः रणजीत पाटील

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

मुंबईः 'कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुला मुलींच्या' बाल सुधार गृहातील कार्यकाळात शिक्षणासाठी व अवांतर वाचन, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी आणि ते भविष्यात देशाचे सर्वोत्तम नागरिक घडावेत म्हणून डोंगरी येथील बाल सुधारगृहातील नूतन ग्रंथालयाचे महाराष्ट्र राज्याचे गृह, विधी व न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

मुंबईः 'कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या मुला मुलींच्या' बाल सुधार गृहातील कार्यकाळात शिक्षणासाठी व अवांतर वाचन, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ व्हावी आणि ते भविष्यात देशाचे सर्वोत्तम नागरिक घडावेत म्हणून डोंगरी येथील बाल सुधारगृहातील नूतन ग्रंथालयाचे महाराष्ट्र राज्याचे गृह, विधी व न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन समयी उपस्थित सामाजिक संस्था, समाज धुरीन आणि मुलांसमोर आपले विचार व्यक्त करताना रणजीत पाटील म्हणाले की, 'गरीब आई-बापाचा मुलगा चांगले संस्कार झाल्याने आय.ए.एस. होतो. समाजातील ज्या लोकांकडे बरेच काही आहे त्यांनी आपले योगदान समाजासाठी दिल्यास समाजात चांगले बदल झाल्याचे पाहण्यात येईल. सर्वच काही शासनाने करायचे असे का? शासन आपली जबाबदारी योग्य प्रकारे पाड पाडत आहे. यात लोकांचाही सहभाग असावा. समाजाच्या जडण घडणीत सामाजिक जाणीवेचे भान ठेवून समाज धूरीणांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पैसा महत्वाचा आहे पण तो समाजाच्या कल्याणासाठी उपयोगात आल्यास समाजाचा उत्कर्ष करताना फार महत्वाचे बदल घडवित चांगले निर्माण करतो. मुलांनो प्रत्येक गोष्ट करताना अडचणी येतात आपल्याला वाटते हे आवघड आहे पण त्यातही I AM POSSIBLE आहेच. म्हणजे मला हे शक्य आहे असाच अर्थ होतो.'

'समाजात परिवर्तन होतेय. आज मला मुलांशी बोलायचा योग आला. बरे वाटले. या मुलांची पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यांना शक्य ती मदत विधि व न्याय विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. या बाल सुधार गृहातील अनाथ मुलांना मायेची पाखर मिळेल. त्यांना येथून बाहेर गेल्या नंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना त्यांना सहज जाईल या करिता मुलांना कौशल्य विकास शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल. जाणता अजाणतेपणी छोटे-छोटे गुन्हे हातून घडल्याने ही मुले येथे सुधारण्यासाठी आणि भविष्यात देशाचे चांगले नागरिक घडावेत या चांगल्या उद्देशाने येथे आणले गेलेले आहेत. भविष्यात त्यांना सन्मानाने स्वाभिमानाने सामाजिक आयुष्य जागता यावे या साठी ठोस कार्य केले जाईल. या मुलांच्या भल्यासाठी सरकार काम करते आहेच पण समाजानेही आपले सामाजिक दायित्व ओळखून यांना भरीव मदत करावी,' असेही रणजीत पाटील म्हणाले.

व्यास पिठावर एकात्मिक बाल विकास आयुक्त कमलाकर फड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी भावसार, सुधारगृह अधीक्षक तृप्ती जाधव आणि आयोजक ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल मरीन लाइन्सचे प्रकाश मूथ्था हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. कार्यक्रमाचे प्रायोजक प्रेमनारायण परिवार यांनी समित मेहता, डॉ. जीवराज शाह यांचे मार्फत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित केले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :