मोटारीमधून टोपी पाडून बॅटऱया पळविणारा अटकेत

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई: डोक्यावरील टोपी रस्त्यात पाडली आणि गाडी थांबवून मोटारीच्या बॅटऱया पळविणाऱयाला चोराला डोंगरी पोलिसांनी अटक केली असून, एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचा जुन्या व नव्या वापरत्या 70 बॅटऱ्या त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

मुंबई: डोक्यावरील टोपी रस्त्यात पाडली आणि गाडी थांबवून मोटारीच्या बॅटऱया पळविणाऱयाला चोराला डोंगरी पोलिसांनी अटक केली असून, एक लाख सहा हजार पाचशे रुपयांचा जुन्या व नव्या वापरत्या 70 बॅटऱ्या त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

या संदर्भात डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बागडीकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी साबीरअली चिंन्नू खान यांना 27 ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या दरम्यान आरोपी अफजल अली अहमद मंसूरीने त्याची मोठी गाडी पीडी मेलो रोड येथे बंद पडली असून 2 बॅटऱ्यांची आवश्यकता आहे असे सांगितले. त्या प्रमाणे लुकास कंपनीची 4700 रुपयांची एक आणि एक्साइड कंपनीची 3000 रुपयांची एक अशा दोन बॅटऱ्या खान यांनी सोबत नेल्या. गाडीतून जाताना आरोपीने आपल्या डोक्यावरील टोपी रस्त्यात पाडली आणि गाडी थांबवून खान यांना टोपी आणायला सांगितले.

खान गाडीतून खाली उतरून गेल्या नंतर आरोपीने गाडी पळविली. यानंतर खान यांनी आपल्या 2 बट-या चोरी गेल्याची तक्रार डोंगरी पोलिसांत दाखल केली. उप निरीक्षक प्रकाश दिनकर, संग्राम कदम यांनी सदर चोरीचा तपास करीत पायधुनी येथून आरोपी अफजल अली अहमद मन्सूरी (प्रॉपर्टी एजंट) यास डोंगरी नुरबाग जंक्शन येथून ताब्यात घेऊन अटक केली. सखोल चौकशी दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल केला.  डोंगरी पोलिस निरीक्षक पाडावे यांच्या या अन्वेषण पथकाने कौशल्य पूर्ण तपास करीत सदरचा गुन्हा कमी कालावधीत उघडकीस आणला.

टॅग्स