नागपाड्यात दोघांकडून 45 लाखांचे चरस जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

गुजरातहून ते चरस घेऊन नागपाडा परिसरात येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटला मिळाली होती. पोलिस पथकाने शनिवारी रात्री अरेबिया हॉटेलजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले

मुंबई - अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी शनिवारी (ता. 15) पोलिसांनी दोघांना गजाआड केले. समीरबेग शब्बीर बेग मिर्झा आणि नोमान गुलाम हैदर शेख अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून साडेदहा किलो चरस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत 42 लाख रुपये आहे. समीर आणि नोमान हे मुळचे गुजरातमधील रहिवासी आहेत.

गुजरातहून ते चरस घेऊन नागपाडा परिसरात येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटला मिळाली होती. पोलिस पथकाने शनिवारी रात्री अरेबिया हॉटेलजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्या वेळी समीरबेगकडून 5 किलो 255 ग्रॅम आणि नोमानकडून 5 किलो 205 ग्रॅम चरस जप्त केले. पोलिस त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

टॅग्स