उड्डाणपुलाखालील अणुशक्तीनगर चौकीत डंपर घुसला; पोलिस गंभीर जखमी

जीवन संभाजी तांबे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

येथील ट्रॉम्बे विभाग वाहतूक पोलिसांच्या चौकीतील एक पोलिस गंभीररीत्या जखमी झाला.

चेंबूर : सायन - पनवेल मार्गावरील अणुशक्तीनगर येथील उड्डाणपुलाखाली असणाऱ्या पोलीस चौकीत आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान डंपर घुसला. त्यामुळे येथील ट्रॉम्बे विभाग वाहतूक पोलिसांच्या चौकीतील एक पोलिस गंभीररीत्या जखमी झाला.

हवालदार प्रताप भाऊ शिंगोटे असे गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. शिंगोटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना नजीकच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उड्डाण पुलाखाली वाहतूक चौकीत डंपर घुसल्याने सायन - पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट