काँग्रेस नेते बाबा सिद्दिकींच्या निवासस्थानी छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

बाबा सिद्दिकी यांच्यासह बांधकाम व्यावसायिक रफीक मुकबूल कुरेशी यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला.

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते व माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि इतर संबंधित व्यक्तींच्या मुंबईतील निवासस्थानी आज (बुधवार) सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात आले.

बाबा सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील निवासस्थानासह पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन विकासात 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप बाबा सिद्दिकी व त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. याप्रकरणी आज हे छापे टाकण्यात आले.

बाबा सिद्दिकी यांच्यासह बांधकाम व्यावसायिक रफीक मुकबूल कुरेशी यांच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात आला. बाबा सिद्दीकी हे कायम बॉलिवूड अभिनेत्यांना इफ्तार पार्टी देण्यावरून चर्चेत असतात.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
एसएमएसद्वारे जोडा पॅन आणि आधार: प्राप्तिकर विभाग
औरंगाबादमध्ये समृद्धी मार्गाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर
बुलडाणा: पोलिसाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

योगी आदित्यनाथ अयोध्येत; 'जय श्रीराम'च्या घोषणा
काबूलमध्ये भारतीय दुतावासाजवळ स्फोट
मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग​
लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी