एफवायजेसीची प्रवेश प्रक्रिया घोषित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - दहावीचा निकाल लागल्यानंतर त्वरित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची बुधवारी घोषणा केली.

विद्यार्थ्यांना 16 ते 27 जूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरला जाईल. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटापासून पुन्हा महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेची लगबग पाहायला मिळणार आहे. ऑनलाईन फॉर्म पूर्ण भरुन झाल्यानंतर 30 जून रोजी पहिली मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल.

1 ते 3 जुलैदरम्यान, ऑनलाईन फॉर्म भरताना केलेल्या चुकांना सुधारण्याची मुदत दिली आहे. 7 जुलै रोजी पहिली मेरीट लिस्ट लागणार. सायंकाळी पाच वाजता मेरीट लिस्ट जाहीर केली जाईल. 8 ते 11 जुलैदरम्यान विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतात. दुसरी मेरिट लिस्ट दहा दिवसांनी जाहीर होईल. त्यानंतर दोन दिवसांच्या मुदतीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. तिसरी मेरिट लिस्ट मात्र आठवड्याभराने जाहीर होईल. 25 जुलै रोजी तिसरी लिस्ट जाहीर झाल्यानंतर पुढील दोन दिवस प्रवेशासाठी दिला जाईल. चौथी मेरीट लिस्ट 1 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. तीन ऑगस्टपर्यंत विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये फी भरुन प्रवेश घेऊ शकतात.

टॅग्स