मीरा-भाईंदरसाठी उद्या मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - मीरा-भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी येत्या रविवारी (ता.20) मतदान होत असून, अपक्षांसह सर्व पक्षांचे मिळून एकूण 509 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी सोमवारी (ता.21) होणार असून, प्रचाराचा कालावधी संपला आहे. मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत होणार आहे. 

मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख पक्षांसह छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत. भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार प्रताप सरनाईक, कॉंग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सचिन अहिर आदींनी सभा घेतल्या. महापालिकेसाठी एकूण 24 प्रभाग असून 95 जागा आहेत. यासाठी पाच लाख 93 हजार 345 मतदार आहेत. रिंगणात भाजपचे 93, कॉंग्रेसचे 73, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 63, शिवसेनेचे 93, मनसेचे 24; तर अपक्ष 106 उमेदवार आहेत. 

निवडणूक रिंगणात 

24  - महापालिकेचे प्रभाग 

95 -  जागा 

509  - उमेदवार 

5 लाख 93 हजार 345 - मतदार