अकरावीची आज पहिली गुणवत्ता यादी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. 10) सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत 100 टक्के गुण मिळवणारे 14 आणि 90 ते 95 टक्के गुण मिळवणारे 10 हजार 991 विद्यार्थी असतील.

मुंबई - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. 10) सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत 100 टक्के गुण मिळवणारे 14 आणि 90 ते 95 टक्के गुण मिळवणारे 10 हजार 991 विद्यार्थी असतील.

अकरावी प्रवेशासाठी दोन लाख 35 हजार 484 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सोमवारी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत किती विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होणार, याविषयी उत्सुकता आहे. पहिल्या यादीत मुंबईतील नामांकित महाविद्यालयांसाठी चुरस असेल. एसएससी बोर्डाचे गुणवंत विद्यार्थी विरुद्ध आयसीएसई, सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशी ही स्पर्धा असेल. आयसीएसई, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी श्रेणीमुळे; तर राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी कला आणि क्रीडा कोट्यातील गुणांमुळे वाढली आहे. त्याचा फायदा त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळवण्यासाठी होऊ शकतो.