एल्फिन्स्टन दुर्घटनेतील बळींची संख्या 23

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

मुंबई: पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावरील पुलावर शुक्रवारी (ता. 29) झालेल्या चेंगराचेंगरीतील जखमी सत्येंद्रकुमार कनोजिया याचा आज सकाळी मृत्यू झाला. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 23 झाली आहे.

सत्येंद्रकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशमधील आहे. तो मुंबईत नोकरीनिमित्त आला होता. त्याचे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यासोबत रुग्णालयात चुलत भाऊ पारसनाथ कनोजिया हा होता. सत्येंद्रकुमारचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी आणि तीन मुले आहेत.

सत्येंद्रकुमारची प्रकृती गंभीर होती. डोक्‍यातील रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.