कर्मचारी संघटनांशी सकारात्मक चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई - "कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,' असा खंबीर निर्धार करत तीन दिवसांच्या कडकडीत संपाचा इशारा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिला होता. आपल्या काही मागण्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नोकरशाही संघटनेच्या प्रतिनिधींच्या हाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनाचा खुळखुळा दिला आहे.

"वर्षा'वर रात्री उशिरा पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले. सातवा वेतन आयोग लागू करणे, पाच दिवसांचा आठवडा, अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती अशा सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी एका झटक्‍यात मान्य केल्या. त्यामुळे ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असल्याचे सांगण्यात आले.