अलोक टेक्‍स्टाईलच्या कामगारांचा बेमुदत ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

तुर्भे - पावणे येथील अलोक टेक्‍स्टाईल लिमिटेडच्या व्यवस्थापनाने १७५ कायमस्वरूपी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी तोट्यात असल्याचे सांगून टाळेबंदी केल्याच्या निषेधार्थ कामगारांनी एकता युनियनच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्यायालयाच्या आदेशाचेही कंपनी पालन करत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजाराम साळवी यांनी दिला आहे. 

अलोक टेक्‍स्टाईलने २५ हजार कोटींचे बॅंकांचे कर्ज असल्याचे सांगत १७५ कामगारांना तीन महिन्यांपासून पगार दिला नाही. त्यानंतर अचानक टाळेबंदी केली. त्यामुळे या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याविरोधात कामगार आयुक्तांकडे दाद मागण्याचा प्रयत्न कामगारांनी केला; परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या कामगारांना न्याय मिळाला नाही तर विधान भवनला धडक देण्याचा इशारा त्यांनी दिला.

आमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू. कामगारांच्या न्याय हक्कांसाठी विधान भवनावर धडक देण्यात येईल. न्यायालयाचे आदेशही कंपनीचे व्यवस्थापन पायदळी तुडवत आहे. 
- राजाराम साळवी, अध्यक्ष, कामगार एकता संघटना.